सांगलीत कायदा व सुव्यवस्था धाब्यावर जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या ;
सांगलीत कायदा व सुव्यवस्था धाब्यावर जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या ;
दि. 31मार्च 2026
सांगली. (संजयनगर );
सांगलीतील संजय नगर परिसरात जुन्या वय मनस्यातून एक थरारक खून प्रकरण उघडकीस आले असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार सौरभ महादेव पवार असे मृताचे नाव असून तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुढे आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातून या घटनेची ठिणगी पडली होती त्यातून निर्माण झालेल्या रागातून संशयीतानी हा जीवघेणा हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शाहिद मुल्ला आणि आयन बिस्ती अशी संशयतांची नावे असून त्यांची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समजते घटनेच्या वेळी सौरभ हा आपल्या मित्रासह दुचाकीवरून महा पालिकेच्या गळ्याजवळ आला होता याच ठिकाणी दबा धरून बसलेल्या हल्ले खोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला धारधार शस्त्राने थेट गळ्यावर वार करण्यात आला. त्याही परिस्थितीत त्याने जीव वाळवाचविण्यासाठी तिथून पळ काढला मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत पुन्हा वार केले.रक्तबमबाळ अवस्थेत सौरभला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले जात होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका संशयताला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून नेमके कारण आणि घटनाक्रम उलगडण्याचे काम वेगाने सुरू आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे



