Maharashtra

पाथर्डीत वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू;

पाथर्डीत वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू;

अहिल्यानगर,पाथर्डी ;दि. 31/03/2026  पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे शेतात काम करत असताना वीज कोसळून शेतकरी शिवाजी रघुनाथ खेडकर (वय ५४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेत त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, खेडकर हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. दरम्यान अचानक वादळी वातावरण निर्माण होऊन वीज कोसळली. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले. त्यांच्यासोबत असलेला पाळीव कुत्राही या घटनेत मृत झाला.दरम्यान, शेतातील जनावरे घरी परतली, मात्र खेडकर हे बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता खेडकर मृत अवस्थेत आढळून आले.आमदार मोनिका राजळे यांनी घटनेची दखल घेत प्रशासनाला माहिती देत पीडित कुटुंबाला मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button