पुणे रेल्वे पोलीस दलातील दिव्या कुंभार यांचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दमदार पराक्रम; ६५ किलो गटात द्वितीय क्रमांक
पुणे रेल्वे पोलीस दलातील दिव्या कुंभार यांचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दमदार पराक्रम; ६५ किलो गटात द्वितीय क्रमांक
सोलापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व निर्झरा केअर फाउंडेशन आयोजित वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत २०२६ ही स्पर्धा सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशाला येथे २८ व २९ मार्च रोजी उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील तसेच पुणे रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय खेळाडू दिव्या प्रभाकर कुंभार यांनी ६५ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक माननीय सौ. अश्विनी सानप मॅडम, ॲडिशनल एसपी श्री पवार साहेब तसेच होम डीवायएसपी श्री यादव साहेब , तसेच मुख्यालय खडकी येथील आर.पी.आय श्री टोणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्या कुंभार यांनी हे यश संपादन केले.
दिव्या कुंभार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी, पुणे
9822548429
