राजापूर नगर परिषद स्थापना दिनानिमित्त १ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन;
राजापूर नगर परिषद स्थापना दिनानिमित्त १ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन;
जि. रत्नागिरी ता. (राजापूर )दि. 31 मार्च 2026;
राजापूर नगर परिषद स्थापन होऊन १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने १ एप्रिल रोजी राजापूर नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणे, सकाळी ९:३० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती, दुपारी ३ ते ८ तीर्थप्रसाद, सायंकाळी ६:३० वाजता जवाहर चौक येथे होम मिनिस्टर कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांना राजापूर शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे, उप नगराध्यक्ष विनय गुरव व मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी केले आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे
