Maharashtra

टाकळीभान येथे अवकाळी पावसाने आठवडे बाजारात दानादन , शेतकऱ्याची पिकाची नुकसान,

 

टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सोमवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान वादळ वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटानेअवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आठवडे बाजारातील छोटे-मोठे व्यापारी, बाजार करू यांची धांदल उडाली. अर्धा तास हजेरी लावलेल्या या अवकाळी पावसाने बाजारची दाणादाण झाली. त्यामुळे व्यापारी व बाजार करू यांची निराशा झाली. त्यानंतर रात्री ७.३० नंतर ही अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. या पावसामुळे काढणीला आलेला गहू, कांदा,मका यांचे मोठे नुकसान झाले असून. शेतकऱ्याच्या तोंडाजवळील घास हिरवला जात आहे. शेतकऱ्यांची गहू काढण्याची व कांदा काढण्याची लगबग सुरू होती. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने पिके आणली असून बाजार मालाचे भाव कमी आहेच परंतु अवकाळी पावसाने नुकसान केल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे होणारा अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त ठरत आहे.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे,श्रीरामपूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button