Maharashtra
पिंपरी-चिंचवडमध्ये गारांसह पावसाची हजेरी; उकाड्यापासून दिलासा
पिंपरी-चिंचवडमध्ये गारांसह पावसाची हजेरी; उकाड्यापासून दिलास

पिंपरी-चिंचवड शहरात आज हवामानात अचानक बदल होत काही भागात हलक्या पावसासोबत किरकोळ गाराही पडल्या. दुपारनंतर वातावरण ढगाळ झाल्यानंतर थोड्याच वेळात रिमझिम पावसाने हजेरी लावली.
गारपीट जोरदार नसली तरी काही ठिकाणी लहान गारांचा हलका सडा पडल्याचे नागरिकांनी सांगितले. या बदलत्या हवामानामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
अचानक झालेल्या या पावसामुळे रस्त्यावर थोडीफार गर्दी आणि वाहतुकीचा वेग कमी झाल्याचे दिसून आले. सध्या वातावरण ढगाळ असून पुढील काही तासांत अधूनमधून हलक्या सरी सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


