Maharashtra

बिहारमध्ये राजकीय हालचाल; नितीश कुमारांचा विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा.

बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून मुख्यमंत्री Nitish Kumar यांनी विधान परिषद (MLC) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. २००६ पासून सातत्याने विधान परिषदेचे सदस्य असलेल्या नितीश कुमार यांनी राज्यसभेवर निवड झाल्यानंतर हा निर्णय घेतला.
राजकीय वर्तुळात या निर्णयानंतर चर्चांना उधाण आले आहे. नितीश कुमार लवकरच मुख्यमंत्री पदाचाही राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात असून, बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपचे नेते आणि बांकीपूर मतदारसंघाचे आमदार Nitin Nabin यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते देखील राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या सर्व घडामोडींमुळे बिहारमध्ये सत्ताबदल किंवा नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली असून, राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी – शाम शिरसाठ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button