Maharashtra

सांगली येथे साकारणार इतिहास ;महामानावाचा 14 फूट उंच पुतळा ;


सांगली येथे साकारणार इतिहास ;महामानावाचा 14 फूट उंच पुतळा ;

सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा १४ फुटी ब्रॉन्झ धातूचा भव्य पुतळा सांगलीतील भीमांगण परिसरात उभारला जाणार आहे. या पुतळ्याच्या आगमनानिमित्त रविवार (दि. २९) रोजी दुपारी ४ वाजता मिरज मिशन हॉस्पिटल ते भीमांगण परिसरापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष स्नेहल सावंत व सचिव बीरेंद्र थोरात यांनी दिली.

भीमांगण परिसरात गेल्या ४५ वर्षांपासून असलेल्या जुन्या पुतळ्याच्या जागी हा नवीन पुतळा उभारण्यात येत असून, परिसराच्या विकासासाठी सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून उपलब्ध झाला होता.

सध्या सुभाषनगर येथे मूर्तिकार अमोल सूर्यवंशी यांनी सुमारे १६०० किलो वजनाचा १४ फुटी ब्रॉन्झ पुतळा साकारला आहे. १४ एप्रिल रोजी होणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर १४ फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुतळा सांगलीत दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत उभारणी पूर्ण होणार असून, अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.

पत्रकार विजय रणभोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button