Maharashtra

गोवंशाची अमानुष वाहतूक उघड; उमरखेड पोलिसांची धडक कारवाई, २.२३ लाखांचा

गोवंशाची अमानुष वाहतूक उघड; उमरखेड पोलिसांची धडक कारवाई, २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त;
उमरखेड, दि. 26/03/26;
तालुक्यातील विडूळ बसस्थानक परिसरात गोवंश जनावरांची अवैध व अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून उमरखेड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टाटा एस वाहनासह चार जनावरे असा एकूण सुमारे २ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दि. २५ मार्च रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड-विंडुळ मार्गावरून टाटा एस (क्रमांक MH 48 AY 0560) या वाहनातून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ विडूळ बसस्थानकाजवळ सापळा रचून संशयित वाहन अडवले.
तपासणीदरम्यान वाहनामध्ये चार गोवंश जनावरे अत्यंत दाटीवाटीने, हालचालीस जागा नसलेल्या अवस्थेत कोंबून ठेवलेली आढळली. तसेच जनावरांना चारापाणी न देता आखूड दोरीने बांधून अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक सैयद मुस्तफा सैयद इब्राहीम (वय ३८, रा. जनता कॉलनी, हिमायतनगर, जि. नांदेड) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध संबंधित प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालात टाटा एस वाहन व चार गोवंश जनावरे यांचा समावेश असून त्याची एकूण किंमत सुमारे २ लाख २३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांनी कठोर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पत्रकार विजय रणभोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button