करोली येथे श्री चैतन्यगिरी महाराज सप्ताह सोहळ्याचे आयोजन

करोली येथे श्री चैतन्यगिरी महाराज सप्ताह सोहळ्याचे आयोजन
जि. सांगली, ता. कवठेमहांकाळ (करोली टी) :
करोली येथे श्री चैतन्यगिरी महाराज सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक सोहळ्याची सुरुवात गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ रोजी पहाटे काकड आरती व अभिषेकाने होणार आहे.
या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी पूजा-अर्चा, दुपारी केळी खुटे आणणे, तसेच सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. रात्री ८ वाजता कीर्तन व भारूडाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
या सोहळ्यात कीर्तनकार ह.भ.प. कुंडलिक साठे महाराज यांचे कीर्तन होणार असून, भारूड सादर करण्यासाठी ह.भ.प . तानाजी महाराज उपस्थित राहणार आहेत.
तसेच सप्ताहात प.पू. श्री. कैवल्यभारती उर्फ बालूमहाराज, प.पू. श्री. १०८ वा. ब्र. सद्गुरु महादेव महाराज, प.पू. श्री. धामाजी महाराज लिंगनूर, सद्गुरु श्री. बाळनाथजी महाराज सोनी आणि योगी शितलनाथ महाराज (कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सकाळी १० ते ३ या वेळेत भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, श्री. संसार दत्ता संगीत भजनी मंडळ यांच्यावतीने सादरीकरण होणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन चैतन्य भजनी मंडळ व चैतन्यगिरी महाराज सप्ताह सोहळा मंडळ, करोली (टी) यांनी केले असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार विजय रणभोर
