मंगल प्रवाह संस्थेकडून मोफत वस्तीगृह व अभ्यासिकेची सुविधा सुरू

मंगल प्रवाह संस्थेकडून मोफत वस्तीगृह व अभ्यासिकेची सुविधा सुरू
जि. सांगली (विश्रामबाग) :
मंगल प्रवाह बहुउद्देशीय सामाजिक संस्था, विश्रामबाग (सांगली) यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वस्तीगृह व अभ्यासिका सुविधा सुरू करण्यात आली आहे.
आर्थिक अडचणींमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात अडथळे येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन, सुसज्ज अभ्यासिका, ग्रंथालय तसेच तज्ज्ञ मार्गदर्शन पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी व उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे.
वस्तीगृहासाठी प्रवेश प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून पार पडणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
— पत्रकार : विजय रणभोर

