Maharashtra

कळंबोली येथे “मराठी चित्रपट महोत्सवाचे” आयोजन;

कळंबोली येथे “मराठी चित्रपट महोत्सवाचे” आयोजन;

मराठी चित्रपट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित २८ वा ‘सांस्कृतिक कलादर्पण मराठी चित्रपट महोत्सव’ २ आणि ३ एप्रिल २०२६ रोजी कळंबोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात प्रेक्षकांना केवळ ५० रुपयांत दर्जेदार मराठी चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. कळंबोली येथील सुधागड शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात, नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे.
‘कलादर्पण’चे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी या महोत्सवाची घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, या महोत्सवाच्या आयोजनात ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’चे अध्यक्ष कांतीलाल कडू यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

प्रतिनिधी विजय रणभोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button