Maharashtra

गॅस डिलिव्हरीचा 96 तासांचा दावा फोल; 8–10 दिवस उशीर, एजन्सीसमोर ग्राहकांची रांग

गॅस डिलिव्हरीचा 96 तासांचा दावा फोल; 8–10 दिवस उशीर, एजन्सीसमोर ग्राहकांची रांग

पुणे: घरगुती गॅस सिलेंडर डिलिव्हरी 96 तासांत करण्याचा दावा प्रत्यक्षात फोल ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. भारत गॅस ग्राहकांना सिलेंडर मिळण्यासाठी तब्बल 8 ते 10 दिवस प्रतीक्षा करावी लागत असून एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
ग्राहकांच्या मते, बुकिंग केल्यानंतर चार दिवसांत डिलिव्हरी मिळेल अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात आठवडाभराहून अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकाचे नियोजन विस्कळीत होत असून महिलांना आणि कुटुंबांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
काही ग्राहकांनी सांगितले की, एजन्सीकडून डिलिव्हरीबाबत स्पष्ट माहिती दिली जात नाही. अनेक वेळा “उद्या मिळेल” असे सांगून वेळ काढला जातो. परिणामी, ग्राहकांना थेट एजन्सीसमोर जाऊन चौकशी करावी लागत असून तेथेही मोठी गर्दी होत आहे.
दरम्यान, संबंधित भारत पेट्रोलियम कंपनीकडून 2 ते 4 दिवसांत सेवा देण्याचे मानक असले तरी प्रत्यक्षात त्याचे पालन होत नसल्याची तक्रार आहे. ग्राहकांनी या प्रकाराकडे गंभीरतेने लक्ष देऊन प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. सकाळी ग्राहकांनी रतन गॅस काळेवाडी समोर मोठी रांग लावली होती
ग्राहकांनी याबाबत तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली असून, पुरवठा विभागाने तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button