Maharashtra

जेऊरमध्ये अवैध गॅस साठ्यावर धडक कारवाई; २० सिलेंडर जप्त

जेऊरमध्ये अवैध गॅस साठ्यावर धडक कारवाई; २० सिलेंडर जप्त

करमाळा :तालुक्यातील जेऊर येथील इंदिरानगर परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या LPG गॅस सिलेंडरवर पुरवठा विभागाने धडक कारवाई करत एकूण २० रिकामे सिलेंडर जप्त केले. ही माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रुघ्न चव्हाण यांनी दिली.
मंगळवार, दि. १७ मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जेऊर येथील इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या विजय बोराडे यांच्या ठिकाणी तपासणी केली असता LPG गॅस सिलेंडरचा अवैध साठा आढळून आला. तपासणीदरम्यान संबंधितांकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. काही सिलेंडर आडव्या स्थितीत ठेवलेले असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोका निर्माण झाला होता.
या कारवाईत IOCL, HPCL आणि BPCL या कंपन्यांचे एकूण २० रिकामे सिलेंडर जप्त करण्यात आले. त्यामध्ये १४.२ किलोचे १५ घरगुती सिलेंडर, ५ किलोचे ३ घरगुती सिलेंडर आणि ५ किलोचे २ व्यावसायिक सिलेंडरचा समावेश आहे.
जप्त केलेल्या सर्व सिलेंडरचा पंचनामा करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (सोलापूर), जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे आणि करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रुघ्न मोतीराम चव्हाण व लिपीक-टंकलेखक उदय गोडगे यांच्या पथकाने पार पाडली.
विजय रणभोर, पत्रकार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button