जळगाव महापालिकेच्या अभय शास्ती योजनेला मुदतवाढ द्यावी – नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांची मागणी
जळगाव महापालिकेच्या अभय शास्ती योजनेला मुदतवाढ द्यावी – नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांची मागणी
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेमार्फत नागरिकांच्या थकित मालमत्ता करांवरील दंड माफ करून वसुली वाढविण्यासाठी राबविण्यात आलेली अभय शास्ती योजना नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे. या योजनेमुळे अनेक नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरण्यास पुढाकार घेतला असून महापालिकेच्या वसुलीतही वाढ झाली आहे.
मात्र अद्यापही अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. जळगाव शहर महानगरपालिकेने अभय शास्ती योजनेअंतर्गत वसुलीसाठी तुलनेने कमी कालावधी दिल्यामुळे काही नागरिक कर भरण्यापासून वंचित राहिले आहेत.
यामुळे रामेश्वर कॉलनीतील स्थानिक नागरिक तसेच प्रभाग क्रमांक १९-ड चे नगरसेवक श्री. राजेंद्र घुगे पाटील यांनी सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अभय शास्ती योजनेची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे.
नगरसेवक घुगे पाटील यांनी सांगितले की, मुदतवाढ मिळाल्यास अधिकाधिक नागरिक थकीत मालमत्ता कर भरतील आणि महापालिकेच्या महसुलातही वाढ होईल. त्यामुळे महापालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी सुमेश मुळे
