जळगाव : मेहरूण येथील साईबाबा मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य.
जळगाव : मेहरूण येथील साईबाबा मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य.

जळगाव : शहरातील मेहरूण भागातील साईबाबा मंदिर परिसरात गेल्या महिन्याभरापासून साफसफाई होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मंदिराच्या परिसरासह बाहेरील गटारीदेखील साफ केल्या जात नसल्याची माहिती मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, नगरपालिका कर्मचारी गेल्या महिन्यापासून साफसफाईसाठी आलेले नाहीत. त्यामुळे मंदिर परिसरात कचरा साचत असून भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात मागील महिन्यात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच स्थानिक नगरसेवकांकडूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मंदिर परिसरात दररोज भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे लवकरात लवकर साफसफाई करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून करण्यात येत आहे.
प्रतिनिधी सुमेश मुळे