Maharashtra

छत्रपती संभाजीनगरचा लोकप्रिय रील स्टार अरुण तुपे यांचे दुःखद निधन; चाहत्यांमध्ये हळहळ

छत्रपती संभाजीनगरमधील लोकप्रिय सोशल मीडिया  रील स्टार अरुण तुपे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
१० मार्च २०२६ रोजी सकाळी त्यांच्या बालाजी नगर येथील घरी ते अचेत अवस्थेत आढळले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यानंतर पुढील तपासासाठी त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी घाटी शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला. नातेवाईकांच्या माहितीनुसार, अरुण तुपे यांना अपस्मार (फिट्स)चा त्रास होता.
विशेष म्हणजे, निधनाच्या अवघ्या २४ तासांपूर्वी त्यांनी इन्स्टाग्रामवर शेवटचा रील पोस्ट केला होता आणि चाहत्यांच्या कमेंट्सनाही प्रतिसाद देत होते. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुमारे १.७९ लाख (१७९K) फॉलोअर्स होते आणि ते मुख्यतः कॉमेडी रील्समुळे प्रसिद्ध झाले होते.
त्यांच्या अचानक निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात असून चाहते आणि अनेक सोशल मीडिया क्रिएटर्सनी हळहळ व्यक्त केली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button