Maharashtra
उद्या १२ फेब्रुवारीला भारत बंद; कोट्यवधी कामगारांचा सहभाग अपेक्षित
भारत बंद उद्या १२ फेब्रुवारी
नवी दिल्ली/मुंबई – केंद्रीय कामगार संघटनांच्या आवाहनावरून उद्या (१२ फेब्रुवारी) देशभरात भारत बंद होणार असून सुमारे ३० कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन श्रम संहिता व केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.
काही ठिकाणी बँका, सार्वजनिक वाहतूक व सरकारी सेवांवर परिणाम होऊ शकतो; मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शाळा-कॉलेज बंद ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर अवलंबून राहणार आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


