आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये भाजपची निर्भेळ सत्ता
आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये भाजपची निर्भेळ सत्ता; शिंदे गट भुईसपाट
जत : जत तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ९ पैकी ८ जिल्हा परिषद गटांवर आपले वर्चस्व निर्माण केले, तर पंचायत समितीच्या १८ पैकी १२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.
या निवडणुकीत भाजपच्या झंझावातासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचा पूर्णपणे धुव्वा उडाला. काँग्रेसला ४ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदरात केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
जिल्हा परिषदेचे विजयी शिलेदार:
भाजपकडून शिवाजी खिलारे (शेगाव), रमेश देवर्षी (मुचंडी), सुनील पवार (बनाळी), स्वप्नाली मासाळ (डफळापूर), शिल्पा जीवानावर (बिळूर), बळगोंडा तोरणे (उमदी), कविता पाटील (संख) आणि सरदार पाटील (दरीबडची) यांनी दणदणीत विजय मिळवला.तर जाडर-बोबलाद गटातून राष्ट्रवादीच्या सावित्री रवीपाटील विजयी झाल्या.
निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जल्लोष साजरा केला. या विजयामुळे जत तालुक्यातील राजकीय समीकरणांवर आमदार गोपीचंद पडळकर यांची पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
प्रतिनिधी संजय कोळी.जत /सांगली


