आजपासून बारावी (HSC) परीक्षा सुरू; Lok 1 News तर्फे विद्यार्थ्यांना शुभेच्छा
आजपासून बारावी (HSC) परीक्षा सुरू; Lok 1 News तर्फे विद्यार्थ्यांना शुभेच्छा
नागपूर/प्रतिनिधी : राज्यभर आजपासून बारावी (HSC) बोर्ड परीक्षा सुरू होत असून हजारो विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर Lok 1 News तर्फे सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचावे, शांत मनाने व आत्मविश्वासाने पेपर सोडवावा तसेच कोणत्याही अफवा किंवा गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करून प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घेऊन वेळेआधी निघण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असल्याने तणाव न घेता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असा संदेशही Lok 1 News तर्फे देण्यात आला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

