
वडूज पंचायत समिती गणात संदीप दादा मांडवे यांचा दणदणीत विजय; २५०० मतांची आघाडी
वडूज : वडूज पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत संदीप दादा मांडवे यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात लक्ष वेधले आहे. उपलब्ध ताज्या माहितीनुसार, मांडवे यांनी आपल्या निकटतम प्रतिस्पर्ध्यावर तब्बल २५०० मतांनी मात केली आहे. वडूज शहरासह ग्रामीण भागातील अनेक बुथवर त्यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली.
निकाल जाहीर होताच वडूजमध्ये समर्थकांकडून जल्लोषाला सुरुवात झाली. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विजयाचे प्रमाणपत्र देण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
स्थानिक राजकारणात या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना मागे टाकत मिळवलेला हा विजय मांडवे यांच्या मजबूत जनसंपर्क आणि संघटनशक्तीचे प्रतीक मानला जात आहे.
प्रतिनिधी जीवन इंगळे

