Maharashtra

हिरकणी मावळे रायडर्सचा वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे विशेष सत्कार

हिरकणी मावळे रायडर्सचा वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे विशेष सत्कार

चिंचवड, ता. ८ फेब्रुवारी २०२६ — पर्यावरण जनजागृती व सायकलच्या वापरातून आरोग्याचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने हिरकणी मावळे रायडर्स टीमने चिंचवड–पुणे–तुळजापूर मार्गे अक्कलकोटपर्यंत सुमारे ४०० किलोमीटरचा दिवस-रात्र सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या खडतर मोहिमेत महिला व पुरुष अशा एकूण दहा सायकलपटूंचा सहभाग होता.
वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने स्वामी समर्थ मठ, चिंचवड येथे या सर्व सायकलपटूंचा जाहीर सत्कार करण्यात आला. प्रज्ञा अजगर, सोनाली कदम, अपर्णा अष्टीकर, ऋतुजा शेटे, हर्षल बोरकुले, मकरंद नरवडे, मुकुंद पाटे, प्रदीप साळी, स्वराज गावडे, दिनेश निकुंभ आदी सायकलस्वारांनी मोहिमेत सहभाग घेतला.
कार्यक्रमास पोलीस फ्रेंड वेल्फेअर संस्थापक/अध्यक्ष व स्वामी समर्थ मठाचे प्रमुख गजानन चिंचवडे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, एडवोकेट विलास कडेकर, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, धनंजय मांडके, उल्हास दाते, अर्जुन पाटोळे, अपर्णा कुलकर्णी, सरिता कुलकर्णी, बाळासाहेब जगताप, श्रीनिवास जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण जनजागृती व सायकलच्या आरोग्यदायी महत्त्वासाठी केलेल्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक झाले असून, वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे झालेल्या सन्मानाबद्दल सायकलपटूंनी आनंद व्यक्त करत आभार मानले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button