Maharashtra

म्हाडा पुणे लॉटरीची सोडत १० फेब्रुवारीला; हजारो अर्जदारांचे लक्ष निकालाकडे

म्हाडा पुणे लॉटरीची सोडत १० फेब्रुवारीला; हजारो अर्जदारांचे लक्ष निकालाकडे

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) पुणे मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत १० फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये सुमारे ४,१८६ घरांचा समावेश असून हजारो अर्जदारांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.
सोडतीनंतर विजेत्यांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. तसेच अर्जदारांना निकालाबाबत SMS व ईमेलद्वारेही माहिती दिली जाणार आहे. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांसाठी ही सोडत महत्त्वाची ठरणार असून घर मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
म्हाडाने अर्जदारांना अधिकृत संकेतस्थळावरच निकाल तपासण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button