Maharashtra

भोसरीतील युवा उद्योजक धीरज चुत्तर यांचे दुःखद निधन; मरणोपरांत अवयवदानातून दिला समाजाला प्रेरणादायी संदेश

भोसरीतील युवा उद्योजक धीरज चुत्तर यांचे दुःखद निधन; मरणोपरांत अवयवदानातून दिला समाजाला प्रेरणादायी संदेश

भोसरी : भोसरी–आळंदी रोड परिसरातील युवा उद्योजक धीरज सुभाष चुत्तर (वय ३९) यांचे अचानक निधन झाल्याने भोसरी परिसरात शोककळा पसरली आहे. ते आदिनाथ प्रोव्हिजन स्टोअरचे मालक सुभाष शेठ चुत्तर यांचे चिरंजीव होते.
सुभाष शेठ चुत्तर यांनी गेल्या सहा दशकांपासून भोसरीत प्रामाणिकपणा, गोड वाणी आणि सौहार्दपूर्ण स्वभावाच्या जोरावर व्यावसायिक क्षेत्रात भक्कम पाया रचला होता. त्यांची परंपरा पुढे नेत धीरज चुत्तर हे प्रेमळ, प्रामाणिक व मेहनती युवा उद्योजक म्हणून परिसरात ओळखले जात होते.
धीरज चुत्तर हे श्री धर्मवीर संभाजी व्यापारी मित्र मंडळ, अखिल भोसरी–आळंदी रोड व्यापारी मंडळ तसेच श्री गणेश मित्र मंडळाचे सक्रिय सदस्य होते. सामाजिक व व्यापारी उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच उत्साही सहभाग असायचा.
त्यांच्या आकस्मिक निधनाने व्यापारी व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नगरसेवक सागर गवळी, विविध व्यापारी मंडळांचे पदाधिकारी व सदस्य तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. दरम्यान, चुत्तर कुटुंबीयांनी धीरज यांच्या मरणोपरांत अवयवदानाचा घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा व कृतज्ञता अधोरेखित केली आहे.

प्रतिनिधी विजय अडसूळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button