Maharashtra
१२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान
१२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान
महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आली आहे. विविध पक्षांचे हजारो उमेदवार रिंगणात असून ग्रामीण भागात मतदानाला प्रतिसाद मिळत आहे. शांततापूर्ण मतदानासाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


