पुणे : ब्राह्मण समाजातील युवकांसाठी कर्ज प्रकरणांवर सकारात्मक चर्चा
पुणे : ब्राह्मण समाजातील युवकांसाठी कर्ज प्रकरणांवर सकारात्मक चर्चा

पुणे, दि. ५ फेब्रुवारी २०२६ — विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री श्री. आशिष दामले यांची ब्राह्मण महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण शिरसीकर यांनी भेट घेतली.
या भेटीदरम्यान ब्राह्मण समाजातील युवकांसाठी वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत प्रकरणे मंजूर करण्याबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. समाजातील युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे आश्वासन श्री. दामले यांनी दिले.
यावेळी ब्राह्मण महासंघाच्या वतीने महामंडळाला संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले. तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांवरही चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548428