नेवासा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे ८ फेब्रुवारी रोजी भूमिपूजन.a
नेवासा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे ८ फेब्रुवारी रोजी भूमिपूजन
नेवासा : नेवासा तालुका न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भव्य भूमिपूजन सोहळा रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी नेवासा शहरात पार पडणार आहे. या कार्यक्रमास उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
या प्रसंगी माननीय न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी (उच्च न्यायालय, मुंबई), माननीय न्यायमूर्ती श्री रोहित जोशी (उच्च न्यायालय, मुंबई) यांच्यासह न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नेवासा तालुका न्यायालयाच्या वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर ही नवीन, आधुनिक व सुसज्ज इमारत उभारण्यात येत असून, यामुळे न्यायप्रक्रियेला अधिक गती मिळणार असून न्यायदान अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रॅक्टिशनर बारचे तालुकाध्यक्ष ॲड. लक्ष्मण घावटे व नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अजय रिंधे यांनी केले आहे.
प्रतिनिधी : अस्मिता मीडिया, नेवासा.


