Maharashtra

नांदेड हादरले! सरपंचपदाच्या लालसेपोटी बापाकडून ७ वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या

नांदेड हादरले! सरपंचपदाच्या लालसेपोटी बापाकडून ७ वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या

नांदेड |
ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरण्याच्या हव्यासापोटी एका क्रूर बापाने आपल्या सात वर्षांच्या चिमुकल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावात उघडकीस आली आहे. या अमानवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
मुखेड तालुक्यातील केरूर गावातील सलून चालक पांडुरंग कोंडमंगळे (वय २८) याला दोन जुळ्या मुली (वय ७) व एक मुलगा (वय ३) अशी तीन अपत्ये होती. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्यांना सरपंचपदासाठी निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे तिसरे अपत्य अडथळा ठरत असल्याच्या समजुतीतून पांडुरंगने अमानुष कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
२९ जानेवारी रोजी पांडुरंगने आपली मुलगी प्राची हिला दुचाकीवर बसवून तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील निजामसागर कालव्यापर्यंत नेले व तिला निर्दयपणे पाण्यात ढकलून दिले. घटनेदरम्यान एका शेतकऱ्याने ही बाब पाहिल्यानंतर संशय व्यक्त केला. तेलंगणा पोलिसांनी दुचाकी क्रमांकाच्या आधारे तपास करत पांडुरंगला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button