भोसरीलां मिळाला महापौर पदाचा मान,:- रवि लांडगे यांची महापौर पदी बिनविरोध पिंपरी-चिंचवड महापौर/उप महापौर पदावर भाजपाचाच झेंडा
भोसरीलां मिळाला महापौर पदाचा मान,:- रवि लांडगे यांची महापौर पदी बिनविरोध पिंपरी-चिंचवड महापौर/उप महापौर पदावर भाजपाचाच झेंडा
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महापौर भाजपचाच असेल,” असा ठाम विश्वास भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला होता आणि अखेर तो प्रत्यक्षात उतरला आहे. भाजपकडून महापौरपदासाठी रवि लांडगे तर उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा महापौर निश्चित झाला आहे. तसेच, शर्मिला बाबर यांचाही निवड निश्चित मानली जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी रवी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी भाजपाचे नेते आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, ज्येष्ठ नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका नम्रता लोंढे, ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अभिषेक बारणे,सागर गवळी, माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरात आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पाणीपुरवठा आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे. हा विकासाचा वेग कायम ठेवण्याची जबाबदारी महापालिका सभागृह पार पाडेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ
9623113336

