Maharashtra

श्री भगवंत महोत्सव मंडळ, पुणे यांचेवतीने सारसबाग पुणे येथे स्नेहमेळावा संपन्न

श्री भगवंत महोत्सव मंडळ, पुणे यांचेवतीने सारसबाग पुणे येथे स्नेहमेळावा संपन्न.

दि १ फेब्रुवारी २०२६ रोजी सारसबाग पुणे येथे श्री भगवंत महोत्सव मंडळ पुणे यांचे वतीने स्नेहमेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी श्री भगवंताच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन जेष्ठ श्री भगवंत भक्त श्री शामसुंदर मुळे सर व श्री बालकिसनजी जाजु यांचे हस्ते करणेत आले.
सदर मेळाव्या आधी कार्यकारणी मंडळाची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत दि ९ मे २०२५ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा अहवाल सीए महेशजी जाजु यांनी सादर केला. सदरचा अहवाल कार्यकारणीने एकमताने मंजुर केला. श्री भगवंत महोत्सव मंडळ पुणेच्या लेखापरिक्षणाचे काम श्री महेशजी जाजु यांनी विना मोबदला करून मंडळाला सहकार्य केल्या बद्धल त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच दि २८ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या श्री भगवंत महोत्सवाचे नियोजन करण्यात आले. सदरचा श्री भगवंत महोत्सव सारसबाग पुणे येथे करण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीनंतर श्री देवदत्त मोरे व त्यांच्या टिमचा सुगमसंगीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण शिरसीकर यांनी केले. दि ९ मे २०२५ रोजी झालेल्या कार्यक्रमाचा लेखाजोखा व अहवाल वाचन सचिव श्री कैलास बडवे यांनी केले. तसेच श्री भगवंत महोत्सव मंडळ पुणे ही संस्था रजिष्टर करण्यात आल्याचे जाहीर केले. तसेच मंडळाने 80 G व 12 अ च्या सर्टिफिकेट मिळणेसाठी रितसर अर्ज दाखल केल्याचे सांगितले.
सदर स्नेहमेळाव्यात श्री अभय देशपांडे, श्री बालकिसन जाजु, श्री अविनाश देशपांडे, श्री सुभाष जोशी व श्री श्रीधर कांबळे यांनी महोत्सवाचे कार्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रत्येकानी गाण पण सादर केले.
सदर कार्यक्रमात सर्व उपस्थित श्री भगवंत भक्तांना तिळगुळाचे वाटप करण्यात आले.
या स्नेहमेळाव्याला मंडळाचे अध्यक्ष श्री ओंकार एकशिंगे, सचिव श्री कैलास बडवे, खजिनदार श्री देवदत्त मोरे, प्रविण शिरसीकर, चिन्मय कुलकर्णी, सुनंदा परांडकर, सुनिता पाटील व उज्वला धर्माधिकारी हे पदाधिकारी व श्री भगवंत भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button