Maharashtra

केंद्रीय अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मधुकर बच्चे

केंद्रीय अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मधुकर बच्चे

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला गती देणारा असल्याचे मत मधुकर बच्चे यांनी व्यक्त केले आहे. ते केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार-प्रसार समिती, पिंपरी-चिंचवड शहराचे संयोजक तसेच भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराचे महामंत्री आहेत.
या अर्थसंकल्पात सर्व घटकांचा समतोल साधण्यात आला असून सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. उद्योग, पायाभूत सुविधा, मध्यमवर्ग, युवक, महिला तसेच शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला नव्या दिशेने नेणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“या अर्थसंकल्पात कोणतीही उणीव जाणवत नाही. विकास आणि आर्थिक शिस्त यांचा उत्तम ताळमेळ साधण्यात आला असून देशाच्या प्रगतीला नवे बळ मिळणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरांतून निश्चितच स्वागत आणि कौतुक केले जाईल,” असे मधुकर बच्चे यांनी सांगितले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button