Maharashtra

मुंबईत दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार; क्राइम ब्रँचकडून तपास सुरू.

 

मुंबई | प्रतिनिधी

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते व दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू येथील शेट्टी टॉवर्स या इमारतीबाहेर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार इमारतीबाहेर चार राऊंड फायर करण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे क्राइम ब्रँच पथक तसेच फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, तसेच यामागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून संशयिताचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

रोहित शेट्टी हे ‘सिंघम’, ‘सिम्बा’, ‘सूर्यवंशी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक असल्याने या घटनेचे पडसाद बॉलिवूडसह सर्वत्र उमटत आहेत. पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

प्रतिनिधी:शाम शिरसाठ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button