Maharashtra

इतिहास घडला : सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

राज्यातील राजकारणात इतिहास घडला : सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ

राज्यातील राजकारणातून आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, राज्यपाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ व महत्वाचे नेते उपस्थित होते. नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली होती.
या निवडीसाठी दिलीप वळसे पाटील यांनी ठराव मांडला, तर छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिले. शपथविधीपूर्वी दुपारी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली.
या बैठकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचे अधिकृत पत्र सादर केले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचं चित्र आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button