Maharashtra

महानगरपालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर; पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खुला महिला’ महापौर

महानगरपालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर; पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खुला महिला’ महापौर
पुणे :
राज्यातील महानगरपालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील महापौर पद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले असून, त्यामुळे आगामी काळात दोन्ही शहरांना महिला महापौर मिळणार हे स्पष्ट झाले आहे.
महापौर आरक्षण सोडतीमुळे राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये सामाजिक व प्रादेशिक समतोल साधण्यात आला असून, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच सर्वसाधारण प्रवर्गांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.
महत्त्वाचे आरक्षण वितरण
कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती (ST)
ठाणे – अनुसूचित जाती (SC)
जालना, लातूर – अनुसूचित जाती (महिला)
पनवेल, इचलकरंजी, उल्हासनगर, कोल्हापूर – ओबीसी
चंद्रपूर, जळगाव, अकोला, अहिल्यानगर – ओबीसी (महिला)
सर्वसाधारण प्रवर्ग
मुंबई, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नागपूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर, नांदेड – खुला प्रवर्ग
पुणे व पिंपरी-चिंचवड – खुला (महिला) प्रवर्ग
भिवंडी – खुला (महिला)
राजकीय हालचालींना वेग
या आरक्षण जाहीरतेनंतर सर्वच पक्षांमध्ये महापौर पदासाठी इच्छुकांची हालचाल वाढली असून, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये महिला नेतृत्व कोणत्या पक्षाकडे जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महापौर आरक्षणामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या रणनीतींना वेग आला असून, शहरातील सत्तासमीकरणांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button