Maharashtra

मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक : आज मतदानास सुरुवात*

*मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक : आज मतदानास सुरुवात*

मिरा रोड | प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत असून, उत्साहात नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदान प्रक्रिया सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
मीरा-भायंदर महापालिका क्षेत्रात विविध प्रभागांमध्ये मतदानासाठी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, शांततापूर्ण व सुरळीत मतदानासाठी प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अतिरिक्त सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीत विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने मतदारांमध्ये उत्सुकता आहे. स्थानिक विकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक आणि नागरी सोयीसुविधा हे प्रमुख मुद्दे या निवडणुकीत केंद्रस्थानी आहेत.
प्रशासनाकडून मतदारांना ओळखपत्रासह मतदान केंद्रावर येण्याचे आवाहन करण्यात आले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानात सहभागी होऊन लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. आजच्या मतदानातून मीरा-भाईंदरच्या आगामी कारभाराची दिशा ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button