भाजप च्या निर्धार मेळाव्यात भोसरी मध्ये फक्त भाजपच कार्तिक सर लांडगे यांचा ठाम विश्वास
भाजप च्या निर्धार मेळाव्यात भोसरी मध्ये फक्त भाजपच
कार्तिक सर लांडगे यांचा ठाम विश्वास
भोसरी प्रभाग ६ मध्ये फक्त भाजपच – कार्तिक सर लांडगे यांचा ठाम विश्वास
भोसरी प्रभाग क्रमांक ६ मध्ये फक्त भारतीय जनता पक्षच असा ठाम विश्वास आमदार बंधू कार्तिक सर लांडगे यांनी व्यक्त केला. स्व. अंकुशराव लांडगे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शतप्रतिशत भाजप ताकतीने काम करत असून, हा लढा केवळ भोसरीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहरात भाजपचे उमेदवार विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेची सुरुवात बिनविरोध नगरसेवक रविभाऊ लांडगे यांच्यापासून झाली असून, रविभाऊंनी आपल्या प्रभागात केलेल्या भरीव विकासकामांच्या जोरावर आपले स्थान निश्चित केले आहे. स्व. अंकुशराव लांडगे यांच्या प्रमाणेच रविभाऊ लांडगे यांचा सन्मान पक्ष नक्कीच राखेल, असे आश्वासन कार्तिक सर लांडगे यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सौ. श्रद्धा लांडगे, यशोदा बोईनवाड, राजेंद्र लांडगे, गोपी धावडे, अनिल लांडगे, नवनाथ लांडगे, सतीश लांडगे, शेखर लांडगे, हनुमत लांडगे, महादेव चव्हाण, राहुल लांडगे, बाळाभाऊ लांडगे यांच्यासह प्रभागातील उमेदवार रेखाताई देवकर, राजश्री लांडगे, योगेश लांडगे उपस्थित होते. स्थानिक नागरिक, कार्यकर्त,व
सर्व मान्यवरांच्या हस्ते बिनविरोध नगरसेवक रविभाऊ लांडगे यांचा सत्कार करण्यात आला. निर्धार मेळाव्याचे आयोजन शशिकांत कुलकर्णी आणि सर्व कार्यकर्ते यांनी केले होते.
यावेळी उपस्थितांनी शहरातील सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
