Maharashtra

तामिळनाडू : ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या सतर्कतेने वाचला महिलेचा जीव

तामिळनाडू : ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या सतर्कतेने वाचला महिलेचा जीव
चेन्नई : तामिळनाडूत एका ब्लिंकिट डिलिव्हरी रायडरने मध्यरात्रीच्या वेळी उंदराच्या विषाची ऑर्डर डिलिव्हर करण्याऐवजी एका महिलेचा जीव वाचवला. रात्री उशिरा तीन पाकिटं विषाची ऑर्डर मिळाल्यावर त्याच्या मनात शंका निर्माण झाली आणि त्याने माणुसकी दाखवली.मध्यरात्रीची संशयास्पद ऑर्डर
ब्लिंकिट रायडरला रात्री करीब १२ वाजता चेन्नईतील एका पत्त्यावर उंदराच्या विषाची (रॅट पॉईजन) तीन पाकिटं डिलिव्हर करण्याची ऑर्डर मिळाली. इतक्या उशिरा अशा वस्तूची गरज का, याबाबत त्याला संशय आला. दारावर बेल वाजवताच दार उघडणाऱ्या महिलेचे रडून सुजलेले डोळे आणि थरथरत हात पाहून त्याची शंका खरी ठरली.
रायडरने महिलेला थेट विचारले, “ताई, तुम्हाला काही त्रास आहे का? आत्महत्येसाठी हे मागवलं नाही ना?” तिने सुरुवातीला नकार दिला, पण रायडरने सांगितलं, “खोटं बोलू नका. उंदरांचा त्रास असता सकाळी मागवता आलं असतं. आयुष्य मौल्यवान आहे, टोकाचं पाऊल उचलू नका.” त्याने तिला धीर देऊन समुपदेशन केलं आणि ऑर्डर कॅन्सल करून विष परत नेलं.सोशल मीडियावर व्हायरल, कौतुकाचा वर्षाव
रायडरने हा अनुभव इन्स्टाग्रामवर शेअर केला असता व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी म्हटलं, “रोबोट असता तर फक्त डिलिव्हर केलं असतं, पण माणसाने माणुसकी दाखवली.” ब्लिंकिटने या ‘रिअल लाईफ हिरो’चा गौरव करावा, अशी मागणी होतेय

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button