भोसरीत संत रोहिदास महाराज मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा
आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते 13 जानेवारी रोजी आयोजन
भोसरीत संत रोहिदास महाराज मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा
आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते 13 जानेवारी रोजी आयोजन
भोसरी–दिघी–चऱ्होली परिसरातील चर्मकार समाजाच्या संयुक्त विद्यमाने भोसरी आळंदी रोड येथे संत रोहिदास महाराज यांच्या भव्य दिव्य समाजमंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भूमिपूजन कार्यक्रम भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभहस्ते मंगळवार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे.
समाजातील तरुण पिढीतील युवकांनी पुढाकार घेत समाजासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने या समाजमंदिराची संकल्पना साकारली आहे. या मंदिराच्या माध्यमातून शहरातील समाजबांधव एकत्र येऊन समाजोपयोगी, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करणार असून विखुरलेला समाज एकत्र आणण्याचा मानस यामागे आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर समितीचे अध्यक्ष मिथुन गजरे, उपाध्यक्ष दत्ता डोळस, कार्याध्यक्ष दिनेश गाडेकर, सेक्रेटरी बाळासाहेब चव्हाण तसेच सर्व सभासदांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
भूमिपूजन प्रसंगी भोसरी प्रभागातील बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रविभाऊ लांडगे यांचा चर्मकार समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी शहरातील आजी-माजी नगरसेवक, विविध क्षेत्रांतील उद्योजक, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.
भोसरी, दिघी व चऱ्होली परिसरातील सर्व चर्मकार समाजबांधवांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ
9623113336

