जालन्यात टोलनाक्यावर ९८ लाखांची अघोषित रोख रक्कम जप्त; SST ची मोठी कारवाई
जालन्यात टोलनाक्यावर ९८ लाखांची अघोषित रोख रक्कम जप्त; SST ची मोठी कारवाई
जालना | प्रतिनिधी
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या काळात स्थिर सर्वेक्षण पथकाने (SST) मोठी कारवाई करत छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोलनाक्यावर तब्बल ९८ लाख रुपयांची अघोषित रोख रक्कम जप्त केली आहे.
ही कारवाई ९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली. तपासणीदरम्यान हुंडाई क्रेटा या कारमधून बॅगांमध्ये भरलेली मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम आढळून आली. निवडणूक काळात प्रशासकीय यंत्रणा सतर्क असल्यामुळे ही कारवाई यशस्वी ठरली.
या प्रकरणी चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या सहकार्याने पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपासासाठी प्रकरण आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सदर रक्कम कुणाची आहे, ती कुठून आणली जात होती व तिचा वापर कशासाठी होणार होता, याचा तपास सुरू आहे.
महानगरपालिका निवडणुकीदरम्यान बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर कडक नजर ठेवण्यात येत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
