Maharashtra

मोठ्या संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा; अजित पवार यांना मिळाले बळ

मोठ्या संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा; अजित पवार यांना मिळाले बळ

राज्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाला मोठे बळ मिळाले आहे.
मुस्लिम समाजाच्या अडीअडचणींच्या काळात अजित पवार यांनी नेहमीच खंबीरपणे समाजाच्या पाठीशी उभे राहत भूमिका घेतली आहे. समाजावर संकट आले असताना केवळ बोलघेवडे न राहता त्यांनी आपल्या कृतीतून साथ दिली, असे प्रतिपादन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी यावेळी केले.
“अजितदादांचे नेतृत्व विश्वासार्ह असून त्यांनी विकासासोबतच सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळेच मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे,” असेही सलीम सारंग यांनी स्पष्ट केले.
या वेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजातील अनेक मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जाहीर पाठिंब्यामुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button