Maharashtra

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या मेळाव्यात अजितदादा पवारांचे उद्योजकांना मार्गदर्शन


पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या मेळाव्यात अजितदादा पवारांचे उद्योजकांना मार्गदर्शन

जानेवारी ०८/०१/२०२६पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने कलसागर येथे आयोजित करण्यात आलेल्या उद्योजकांच्या मेळाव्यात मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उद्योजकांच्या अडीअडचणी समजून घेत शासनस्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
मेळाव्यात लघु व मध्यम उद्योगांसमोरील विविध समस्या, अडथळे व अपेक्षा उद्योजकांनी मांडल्या. औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि उद्योगपूरक धोरणांबाबत अजितदादा पवार यांनी सकारात्मक भूमिका मांडली.
या कार्यक्रमाला योगेश बहल, तात्या सपकाळ, सिमाताई सावळे, संदीप बेलसरे, अजित गव्हाणे, श्रीकांत कदम , उदय कुलकर्णी या पदाधिकाऱ्यांसह पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button