Maharashtra

मीरा-भाईंदरमध्ये भाजपाची प्रचारसभा; युती नसतानाही सरनाईकांकडून फडणवीसांचे स्वागत होर्डिंग्स

भाईंदरमध्ये भाजपाची प्रचारसभा; युती नसतानाही सरनाईकांकडून फडणवीसांचे स्वागत होर्डिंग्समीरा

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून प्रचाराचा जोर वाढवण्यात आला असून, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाची जाहीर प्रचारसभा होणार आहे. विशेष बाब म्हणजे मीरा-भाईंदरमध्ये भाजपाची शिंदेसेनेसह युती नसतानाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी शहरभर मोठमोठे होर्डिंग्स लावले आहेत.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा-भाईंदरमध्ये येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेत गुरुवारी रात्रीपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर होर्डिंग्स लावण्यास सुरुवात केली. या होर्डिंग्सवर मुंबई, ठाणे, वसई-विरार येथील महायुतीचे शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख करत मीरा-भाईंदर शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मीरा-भाईंदर दौऱ्याकडे आणि प्रचारसभेकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आगामी महापालिका निवडणुकीत याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी बाळकृष्ण परब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button