दुर्गा टेकडी व MIDC परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
दुर्गा टेकडी व MIDC परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पुणे : ०८/०१/२०२६
दुर्गा टेकडी परिसरासह MIDC भागात बिबट्याचा वावर आढळून आल्याची माहिती मिळाली असून, नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करताना सांगितले की, पाळीव प्राण्यांना घराबाहेर मोकळे सोडू नये. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष काळजी घ्यावी. पहाटे किंवा रात्री उशिरा (अंधारात) एकटे फिरायला जाणे टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बिबट्या दिसल्यास किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ 1926 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा यांनी केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
वनविभागाकडून परिसरात पाहणी व आवश्यक खबरदारीचे उपाय सुरू असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे