Maharashtra
महापालिका निवडणूक: सर्व मते देणे बंधनकारक नाही.
महापालिका निवडणूक: सर्व मते देणे बंधनकारक नाही.
महापालिका निवडणूक: सर्व मते देणे बंधनकारकनाही.महापालिका निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असून, प्रत्येक प्रभागातून जितके सदस्य निवडून द्यायचे आहेत तितकीच मते देणे बंधनकारक नाही. मतदाराने चारपेक्षा कमी उमेदवारांना मत दिले तरी त्याने दिलेली सर्व मते वैध ठरणार आहेत.
तथापि, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी मतदारांनी उपलब्ध असलेली सर्व मते देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी सांगितले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे