Uncategorized

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे दुःखद निधन

पुणे, ६ जानेवारी २०२६
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे दुःखद निधन


पुण्यातील ज्येष्ठ राजकारणी आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे ६ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या दीर्घकालीन आजारामुळे पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.
सुरेश कलमाडी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवले. केंद्रीय राज्यमंत्री (रेल्वे) म्हणूनही त्यांनी कार्य केले आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपदही भूषवले. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे फेस्टिव्हल व पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सारख्या उपक्रमांना मोठी लोकप्रियता मिळाली.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीत २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते.त्यांनी आपल्या कार्यातून पुण्याला आणि देशाला महत्त्वाचे योगदान दिले.
कलमाडी यांच्या निधनाने पुणे आणि महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी २ वाजेपर्यंत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन ठेवले जाणार असून त्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
शोकाकुल वातावरणात विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि जनतेने त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button