प्रभाग ३० ‘ब’ मधून सौ. मथुरा सुनील भोईर ‘पुस्तक’ चिन्हावर निवडणूक रिंगणात
प्रभाग ३० ‘ब’ मधून सौ. मथुरा सुनील भोईर ‘पुस्तक’ चिन्हावर निवडणूक रिंगणात
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत
प्रभाग क्र. ३० ‘ब’ (दापोडी–फुगेवाडी–कासारवाडी) अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवरून
अपक्ष उमेदवार सौ. मथुरा सुनील भोईर या ‘पुस्तक’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
सौ. भोईर यांनी शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर आधारित विकासाचा अजेंडा जाहीर केला आहे. प्रभागातील शाळांसाठी मॉडेल स्कूल, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल व विज्ञान सुविधा, अत्याधुनिक मॉडेल दवाखाना, महिलांसाठी आरोग्य व स्वयंरोजगार योजना, तसेच शून्य कचरा प्रभाग ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
युवकांसाठी क्रीडा सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष, रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा यांवरही त्यांनी भर दिला आहे.
“चालवा मस्तक, निवडा पुस्तक” असा संदेश देत त्यांनी मतदारांना विकासासाठी ‘पुस्तक’ चिन्हासमोरील बटण दाबण्याचे आवाहन केले आहे.
📍 संपर्क कार्यालय :
“काटे वृंदावन”, काटे सह. गृहरचना सोसायटी,
फ्लॅट नं. ५०१, मोरया हॉस्पिटलमागे, दापोडी, पुणे – १२
🗳️ मतदान : गुरुवार, १५ जानेवारी २०२६
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

