लोहमार्ग पुणे सेवानिवृत्त पोलीस बांधवांचा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात साजरा
लोहमार्ग पुणे सेवानिवृत्त पोलीस बांधवांचा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात साजरा


पुणे :
लोहमार्ग पुणे सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी पोलीस मुख्यालय, खडकी येथे मोठ्या उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सेवानिवृत्त पोलीस बांधव उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर सहकारी पुन्हा एकत्र आल्याने स्नेह, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मा. भुजंगराव मोहिते साहेब (सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य) हे होते. तसेच पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप मॅडम (लोहमार्ग, पुणे) यांनी विशेष उपस्थिती लावली.
यावेळी राखीव पोलीस निरीक्षक टोणे तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट व सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दत्ता टेमघरे हेही उपस्थित होते.
या कार्यक्रमास सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था अध्यक्ष संपत जाधव, सेवानिवृत्त लोहमार्ग पोलीस संस्था अध्यक्ष नाना मापारी, उपाध्यक्ष भानुदास पवळे, कार्याध्यक्ष बंडू जाधव, तसेच पिंपरी-चिंचवड सेवानिवृत्त पोलीस संस्था अध्यक्ष लाड साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सेवानिवृत्त पोलीस बांधवांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यामध्ये राऊत साहेब, हरी मुसळे साहेब, दिगंबर कुलकर्णी साहेब, खुटवड साहेब, शंकर लोटे साहेब, साबळे साहेब, ढावरे साहेब, ज्ञानबा गायकवाड साहेब, विठू बोयने साहेब, थॉमस स्वामी साहेब यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप मॅडम यांनी सेवानिवृत्त पोलीस बांधवांच्या विविध मागण्या सकारात्मकपणे सोडविण्याचे आश्वासन दिले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे समाजातील योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी संस्था, पुणेचे अध्यक्ष श्री. संपतराव जाधव यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला व भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोहमार्ग पुणे जिल्हा पदाधिकारी —
नाना मापारी, भानुदास पवळे, गौतम खरात, रमेश यादवाडे, झुंबर मापारी, प्रकाश गायकवाड, पोपट पवार, अशोक मोहिते, वाडेकर, विटकर, कर्डीले, मकासरे आणि सर्जेराव शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहमेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या वर्धापनदिन सोहळ्यामुळे सेवानिवृत्त पोलीस बांधवांमध्ये आपुलकी, स्नेह आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले. समाजासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचा यथोचित गौरव झाल्याची भावना यावेळी सर्वांच्या मनात होती.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429