Maharashtra
हिंदू महासभेकडून प्रभाग ३७ ‘ड’ कात्रज , धनकवडी. मधून राजेंद्र देशपांडे निवडणूक मैदानात

हिंदू महासभेकडून प्रभाग ३७ ‘ड’ कात्रज , धनकवडी.
मधून राजेंद्र देशपांडे निवडणूक मैदानात
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेने प्रभाग क्रमांक ३७ ‘ड’ मधून राजेंद्र देशपांडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणी, सामाजिक बांधिलकी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून राजेंद्र देशपांडे यांची ओळख आहे.
“जनतेसाठी, जनतेसोबत” या भूमिकेतून विकास, पारदर्शक कारभार आणि हिंदू समाजाच्या हितासाठी ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, पायाभूत विकास आणि सुरक्षिततेसाठी ठोस भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदू महासभेच्या विचारधारेवर विश्वास ठेवत प्रभाग ३७ ‘ड’ मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
