Maharashtra

हिंदू महासभेकडून अजित जोशी यांची प्रभाग २५ (ड) शनिवार पेठ येथून अधिकृत उमेदवारी जाहीर

हिंदू महासभेकडून अजित जोशी यांची प्रभाग २५ (ड) शनिवार पेठ येथून अधिकृत उमेदवारी जाहीर

पुणे | प्रतिनिधी

अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ (ड) – शनिवार पेठ, येथून अजित जोशी यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
“निवडणुकीच्या मैदानात नवीन उमेद घेऊन आम्ही आलोय — जनसामान्यासाठी नवीन पर्याय!” या ठाम भूमिकेसह हिंदू महासभा निवडणूक रणांगणात उतरली आहे.
प्रखर हिंदुत्वाची भूमिका, जनतेचा विश्वास आणि विकासाभिमुख धोरणांच्या जोरावर सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
अजित जोशी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून विविध सामाजिक, नागरी व जनहिताच्या आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
नुसत्या आश्वासनांपेक्षा ठोस कृती, पारदर्शक प्रशासन आणि प्रलोभनांच्या राजकारणातून जनतेची मुक्तता हा हिंदू महासभेचा मुख्य अजेंडा असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अजित जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, वाहतूक व पार्किंग समस्या, सुरक्षा, पारदर्शक प्रशासन तसेच सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे अजित जोशी यांनी सांगितले.
उमेदवारी जाहीर होताच प्रभाग २५ (ड) मधील कार्यकर्ते, नागरिक व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी, पुणे
📞 ९८२२५४८४२९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button