चिंचवड स्टेशन–मोहननगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा.

चिंचवड स्टेशन–मोहननगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा
पिंपरी (प्रतिनिधी):
प्रभाग क्रमांक १४ अंतर्गत काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती व दत्तवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
चिंचवड स्टेशन, साईबाबानगर, दवाबाजार, मोहननगर तसेच सर्व्हे नंबर १३५ परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर व अरुणा लंगोटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चारही उमेदवार अनुभवी असून त्यांना प्रभागातील स्थानिक प्रश्नांची सखोल जाण आहे. ते नेहमी नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी समजून घेतात व सुख-दुःखात सहभागी होत असल्याने जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी उमेदवारांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
संपूर्ण प्रभागात घरोघरी भेटी देत प्रचार सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
प्रतिनिधी : शाम शिरसाठ पिंपरी चिंचवड ,पुणे